Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Priyanka Borude

Inspirational

4.4  

Priyanka Borude

Inspirational

आई

आई

1 min
375


मला जन्म देतांना झाल्या ग तुला वेदना,

भोगल्यास तू प्रचंड नरकयातना ||१||


मला पाहताना ,हातात घेताना ,भरून आले तुला,

विसरलीस सर्व वेदना आलेल्या तुझ्या वाट्याला||२||


माझे अचानक आलेले अपंगत्व ऐकून झालीस दुःखी तू,

मन खंबीर केलेस ,धाडसी केलेस, माझ्यासाठी तू ||३||


केलास एकच निर्धार सांभाळशील मला माझ्या अपंगत्वाला,

ठेवुनी एकच जिद्द की स्वावलंबी करशील मला ||४||


त्यासाठी अर्पण केलेस तू तुझे सर्वस्व,

 खरच देवाने पाहिले तुझे सत्व||५||


कधीही काही मौजमजा आनंद लुटला नाही स्वतःसाठी,

केवळ आणि केवळ राबराब राबलीस माझ्यासाठी ||६||


शिकवल्यास तू लहान लहान गोष्टी, कला,

आयुष्य अर्थपूर्ण जगण्याचे ,परोपकाराचे मोलाचे ज्ञान दिलेस मला||७||


तुझ्या कडे पाहुन शिकलो मी मेहनतीची पराकाष्ठा करायला,

 तूच शिकवलेस मला माझ्या पायावर उभे राहायला||८||


अपंगत्वाला दूर करण्यासाठी करून घेतलेस माझ्याकडून नियमित परिश्रम, व्यायाम 

तुझ्या आणि फक्त तुझ्या मुळेच आई मी उभा आहे आज ठाम||९||


अपंगत्वाशी केले मी दोन हात, 

होती तुझी ग मला मोलाची साथ ||१०||


माझ्यावर मेहनत घेताना कधी केला नाही स्वतःचा विचार ,

शपथ घेतो आई आता मी आहे खंबीर, देईन तुला आधार||११||


सर्वार्थाने झालो आज स्वावलंबी तुझ्या आधाराने,

भारावून गेलो आहे मी तू मला दिलेल्या या आयुष्याच्या पूर्णत्वाने||१२||


वटवृक्षा सारखी माझी आई, कसे मानू मी तुझे आभार,

या जन्मात तुझ्या ऋणाचे फेडू शकेन का ग मी उपकार||१३|


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational