सुखी आयुष्याची लढाई
सुखी आयुष्याची लढाई
1 min
681
नवी उमंग, नवा उत्साह,नवे ध्येय,नवी आशा,
रोमांच आहे ना आपल्या जीवनात हीच फक्त शहानिशा.
उंच उंच स्वप्ने असावीत, जगण्याला आपल्या अर्थ असावा,
स्वप्नपूर्तीचा आलेख अथांग अथांग बहरावा.
काय हवे या आयुष्यात मला,मन विचार करत राही,
इतरांसारखच संसारातील सुख, समाधान फार काही नाही.
का झगडावे लागतेय आयुष्यातील मूळ सुखांसाठी,
नशिबाला दोष देत का रडायचे खंबीर माणसे असता पाठी.
स्वप्ने आहेत फार छोटी, बास आता सगळे अडथळे,
ईश्वरा थांबव हा सारा खेळ ,मन सैरभैर पळे.
बास आता हा नियतीचा लपंडाव, पुरे झाली ही जीवघेणी कोंडी,
भूतकाळा ने मला बरेच काही शिकवले,नाहीत पडणार पायावर धोंडी.
जगायचे आहे मनभरून,आनंद आणि उत्साहात,
सर्व यशस्वीपणे पार पाडण्यास पाठीवर ठेवशील कारे देवा तुझा प्रेमळ हात..
