Megha patkar
Megha patkar
खानोलकर परिवारात हळवी मेघा हि जन्मली
वसंत,इंदुमतीच्या कुशीत सुंदरशी कळी उमलली
स्वंयसेवी संस्था मुंबईत कामे केली विकासाची
आदिवासी,शेतकऱ्यांसाठी कास सोडली
शिक्षणाची नर्मदा बचाव आंदोलन ही त्यांची सामाजिक चळवळ
हजारो पूरग्रस्त कुटुंबासाठी उरी असे एकच तळमळ
सामान्यांच्या पुनर्वसनास सुरू केले त्यांनी आंदोलन
हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य केले आपले अर्पण
शांती, न्याय मिळविण्यास जनतंत्रासाठी अनंत काम
अन्याय विरुद्ध लढणाऱ्या अशा मातेस शतश: प्रणाम
