मिलन
मिलन
1 min
216
भेटीला तुझ्या ती असे अति आतूर
शुष्क जाहली ती फार विरह सोसून
येईन तूजला भेटण्या हे वचन देऊन
कुठे गेला सख्या तू डाव अर्ध्यात सोडून
डोळ्यात साठवून तुझ्या गोड आठवणी
ती वाट पाहते तुजला आर्त हाक देऊनी
नको पाहूस रे सख्या तिचा अंत एवढा
आता तरी बरस तू होऊनी मेघ सावळा
त्यालाही होती तिच्या प्रेमाची ओढ फार
व्याकुळ तो ही होता तिला भेटण्या सत्वर
ऐकुनी आपुल्या प्रियेची प्रेमळ साद
बरसला घननीळा होऊनी बेधुंद आज
जाहले एकरूप आज दोघांचे श्वास
पावसा धरतीच्या मिलनाची असे नित्य आस...