पायवाट
पायवाट
रानातली पायवाट मला खुणावते
नकळत मी तिच्यासवे दूर जाते
वाटेत भेटती मला गर्द वनराई
बघुनी मन माझे तेथे विसावी
पुन्हा त्या वाटेवर मी चालत राही
नकळत तिच्याशी एकरूप होई
जणू माझ्या परी मला ती भासे
दोघींनाही ओढ अज्ञाताची असे
येणाऱ्या प्रत्येक वळणावर
परत दिसे एक मोठा मार्ग समोर
पण पाऊल माझे वळे आपसूकच
दिसणाऱ्या छोट्याशा पायवाटेवर
जरी माहित नसे कुठे ही नेणार
मी तिच्या सवे दूर दूर जाणार
सोडूनी मार्ग मोठे ही वाट दूर जाते
या वाटेवर चालता चालता
मला आयुष्याचे मर्म उमजते
