राष्ट्रपिता
राष्ट्रपिता
अहिंसेचा जो पुजारी
भारताचा पुत्र खरा
डंका गाजवी त्रिखंडी
नमन करी जोडी करा १
मोहनदास पुर्वीचे
करि सत्याचे प्रयोग
ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी
फुंकले जे रणशिंग २
असहकार असो वा
असो स्वदेशीचा नारा
बापुंसारखा प्रखर
देश भक्त न दुसरा ३
नेमस्त विचार धारा
चालविली तुम्ही खास
नेहरू पटेलासवे
रोखले शत्रुचे श्वास ४
आयुष्य भर आपण
धरिली सत्याची कास
महात्मा नाव घेताना
होतो ईश्वराचा भास ५
