गरज गांधी विचारांची
गरज गांधी विचारांची
स्वार्थापोटी भरकटलेल्या माणसाला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी पैलूंची
नव्याने चालना देणाऱ्या बड्या अस्पृश्यतेला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
वैश्विक पातळीवर झगडणाऱ्या समाजाला
गरज आहे बापूजी तुमच्या सान्निध्याची
धर्मविरोधी पाचारण करणाऱ्या प्रवर्गाला
गरज आहे बापूजी तुमच्या सज्ञानाची
तू तू मै मैं करणाऱ्या या हिंसक प्रवृत्तीला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी तत्त्वांची
माणुसकीची हेळसांड करणाऱ्या जनतेला
गरज आहे बापूजी तुमच्या असण्याची
असत्याचे धोरण पत्करणाऱ्या विकृतीला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
नैतिकता धुडकावून लावणाऱ्या समाजाला
गरज आहे बापूजी तुमच्या गांधी विचारांची
- कवी : नयन धारणकर
