मीरा चानू
मीरा चानू
आधुनिकतेची नव दुर्गा
मीराबाई चानू महान
अनेक पदके मिळवून
नारी शक्तीची शान ||
अविरत मेहनत करुनी
सराव बांबूंच्या बारन
मिळवून रौप्य पदक
उंचावला देशाचा मान ||
स्वप्न धरले मनोमनी
कुंजराणी असे गुरु
ध्यास जिंकण्या अंतरी
प्रयत्न तिचे खूप सुरू ||
एक भारतीय वेटलिफ्टिंग
मीराबाई चानू खेळाडूंनी
ऑलम्पिकमध्ये खेळूनी
राष्ट्रीमंडळ खेळात तोडुनी ||
अभिमान अशा भारतीय
वेटलिफ्टिंग पहिली महिला
जिंकूनी ऑलम्पिक स्पर्धा
नवा विक्रम तिने घडवला
मिराबाई चानु असे महान
गर्व आम्हा नारी शक्तींना
जिद्द,चिकाटी,मेहनतीअसे
सर्वांनीच घेऊया प्रेरणा ||
