गरीब
गरीब
*पेटवू पुन्हा नव्याने ही मशाल आता, *
*लाख वादळांनी मग यावे खुशाल आता...*
*हमेशाच त्यांनी लाख कुरापती केल्या,*
*जिवलगांशी खेळावे का त्यांनी चाल आता..*
*भिडत राहिलो सदा निधड्या छातीने असा मी, *
*कळाले मग तेंव्हा पाठीवर हवी ढाल आता...*
*मी ओळखूनी चुकलो त्यांचे सारे कावे,*
*यावे त्यांनी पांघरुनी कुठलीही खाल आता...*
*जिंदगी तुझ्या कर्जाचा आज उचलतोय बोजा, *
* आयुष्यभरासाठी मी तुझा हमाल आता...!!*
