STORYMIRROR

Sujata Puri

Inspirational

4  

Sujata Puri

Inspirational

आदर्श

आदर्श

1 min
541

मनापासून मस्तक झुकावे

अशी पाउले झालीत कमी

मुखवट्याआड चेहऱ्यांची

देता येईना हमी..


असाही काळ होता

माणसं होती साधी

माणुसकी हाच धर्म

त्यांचा सर्व धर्मा आधी...


बोलण्यात सच्चेपणा अन् 

वागण्यातअसे प्रामाणिकता..

त्यांच्या प्रत्येक कृतीतून

दिसून यायची सामाजिकता..


पोशाख जरी मळलेला

मने मात्र स्वच्छ होती...

मूल्य होती जपलेली.

स्वार्थाची भावनाच नव्हती...


जसा बदलला काळ

माणूसही बदलला खूप..

पैशाला आले महत्त्व

बदलले समाजाने रूप..


फोडा आणि झोडा

आपली तुंबडी भरा..

माणुसकीचे होवो काहीही

स्वतःचेच कल्याण करा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational