प्रणय
प्रणय
असा चांदवा नभात येता
सजते रात्र काजळ काळी..
जीवास तेव्हा पडते भुल
जेव्हा चंद्राजवळ झुकते डहाळी.
अंधारून अशी रजनी येता
अंबरात तेवती दीप किती..
सांज समयी हुरहूर् वाटे
आठवणी या किती सतावती..
नभाशी झुकलेली ती फांदी
अन् जीव ही तसा झुललेला..
कसा काबूत जीव रहावा
अंगणी मोगरा फुललेला.
नितळ निळे आकाश आता
घेई पांघरून अंधाराची शाल..
निसर्गातल्या प्रणयाला येता जाग
काळीज ही होत असे बेहाल..

