जीवन
जीवन
1 min
163
*डोळ्यातून वाहणारे धारोष्ण पाणी*
*कोणत्या दुःखाची आहे निशाणी*
*कितीदा तरी झालेल्या पडझडीतून*
*कोणती पडझड सलते मनी*
*आयुष्याचा प्रवास अविरत चाले*
*अनोळखी आणि अवचित वाटेवर*
*फेसाळलेल्या तुफानी समुद्रात जशी*
*नौका दोलायमान होते लाटेवर*
*वरून दिसे आलबेल सारे*
*आतल्या मोडतोडीचे उत्तर काय*
*दुःखाचे कड आतल्या आत*
*वर वर हसणे वाढत जाय*
*जीवन आहे वाहणारी नदी*
*वेदना असते अबोल राहणारी*
*शांत राहून सतावणारी*
*गोठलेली जलधारा मूकपणे वाहणारी*
*कर्तव्याच्या वाटेवर सावरावं लागतं.*
*मोहाला दूर सारावं लागतं*
*झाले गेले सोडून देऊन*
*ओठावर हसू आणावं .*
