STORYMIRROR

Sujata Puri

Inspirational

3  

Sujata Puri

Inspirational

आयुष्य

आयुष्य

1 min
245

*आयुष्य म्हणजे काय*

*आठवणींचा एक गाव*

*मिळालेल्या गोष्टी सोडून*

*न मिळालेल्या गोष्टींचच नाव*


*आयुष्य म्हणजे पान*

*अनोळखी अक्षरांनी भरलेलं*

*सुखाची वाट पाहत*

*क्षणा क्षणाने सरलेलं*


*आयुष्य म्हणजे बक्षीस*

*विधात्याने आनंदाने दिलेलं*

*कष्ट आणि अनिश्चितपण*

*पावला पावलावर पेरलेलं*


*आयुष्य म्हणजे पाऊस*

*तना मनाला भिजवणारा*

*कधी तहानलं ठेवून*

*कधी तृष्णा विझवणारा*


*आयुष्य म्हणजे प्रवास*

*अनंताकडून अनंताकडे*

*मरणाची वाटते भिती*

*सगळी धाव जगण्याकडे*


*आयुष्य म्हणजे ओंजळ*

*सुख दुःखाने भरलेली*

*कधी कशाची होईल भेट*

 *माहित नाही ठरलेली.*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational