डोळे
डोळे
1 min
188
आपले डोळे सांगतात
आपलं रात्र भर जागणं
अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना
डोळे उघडे ठेऊन बघणं
डोळ्यांची उघडी कवाडे
बघत असतात छताकडे
कितीतरी अनुत्तरीत प्रश्न
उत्तर मागतात स्वतः कडे
कधी डोळे होतात ओले
तर कधी होतात कोरडे
बऱ्या झालेल्या जखमांचे
दिसतात नजरेस ओरखडे
काळजाची व्यथा असते
दुःख डोळ्यांना होते
शब्दांच्या पलीकडले अर्थ
अश्रूंची भाषा सांगते
डोळे मिटले तरी
प्रश्न संपत नसतात
पापणीच्या आत अश्रू
मूकपणे वाहत असतात.
