STORYMIRROR

Sujata Puri

Others

3  

Sujata Puri

Others

वार्धक्य

वार्धक्य

1 min
206

वय वाढत जाईल तश्या

दिसत जातील वार्धक्याच्या खुणा

क्षणभर असतो बहर फुलण्याचा,

समजवं तुझ्या वेड्या मना


 लाज वाटू देऊ नकोस

जोमात उडणाऱ्या पांढऱ्या केसांची

मनाने रहा सदैव तरुण

काळजी नको कोणत्याच वेषाची


जीवनगाणे आपल्या मधुर

स्वरात ओठावर येऊ दे अलगद

होऊ नकोस तेव्हा व्यथित

संपला म्हणून फुलातला मध


जगासाठी तू कुणीही नसु दे

तुझ्यासाठी आहेस तूच सगळं

रुबाबात मिरव तुझी नवलाई

दाखव रूप तुझ आगळं


मुरल्या नंतर फळ होते

आणखीच जास्त नरम,गोड

जागव तुझ्यातला प्रेमाचा ओलावा,

चांगुलपणाची हवी त्याला जोड


वसंत आला आयुष्यात तरी

पानगळ ही होणार असते

काळाच्या ओंजळीतून तुटलेले पान

परत कधीच येत नसते. 


Rate this content
Log in