यामिनी
यामिनी


ओल्या रेशमी वस्त्रात
काया शहारली सारी
घट कटेवरी घेत
नार निघालीया दारी
अंगी तुषारांचे दव
देह ओलाचिंब झाला
अशी कमनिय काया
जीव वेडापिसा झाला
मान जरा वळवता
अशी लाजते नजर
जणू अप्सरा स्वर्गाची
अशी दिसते सुंदर
काळ्या कुंतलाने सारी
रात दिसते अंधारी
केश संभार करुनी
उभी राहिली सुंदरी
मणीमाळ ही मोहक
कर्णफुले डुलणारी
पैंजण पायी पाहून
हृदय ही भुलणारी..
यौवन्नाचा घाट असा
चढशील तरी कसा
तुला पाहता होतसे
तळमळणारा मासा..
बांधता येईना शब्दी
अशी तुझी गोड अदा
उत्कट लावण्ण्यावर
मन होत असे फिदा..