संविधान
संविधान
कोंडले होते श्वास
केलेस मोकळे आकाश..
अंधारल्या होत्या दिशा
दाविलास तू प्रकाश...
शब्द होते मुके
आणि भावना बंदिस्त..
आमच्या सुख स्वप्नांना
संविधानाने केले मार्गस्थ..
जगण्याचा अर्थ उमगला
कळालं शिक्षणाचं महत्त्व..
भीमा तुझ्यामुळे आले
नीरस जीवनात सत्व..
होऊ कसे उतराई
बाबासाहेब तुमच्या उपकाराचे..
शब्दात व्यक्त होणार नाही
मोल संविधानाच्या भाराचे..
मानाचे जगणे दिले
आणि दिला जीवनाला अर्थ..
संविधाना शिवाय होते
सारे काही व्यर्थ..
