जबाबदारी
जबाबदारी
जबाबदारी असणाऱ्या डोळ्यांना
नसतो अधिकार रडण्याचा
त्यांना शाप असतो
घडेल ते पाहण्याचा...
जबाबदारी असणाऱ्या हाताना
नसतो अधिकार हस्तक्षेपाचा
ते देत असतात
शब्द फक्त होकाराचा...
जबाबदारी असणाऱ्या पायांना
नसतो अधिकार थांबण्याचा..
त्यांच्या भाळी असतो
वसा सदैव चालण्याचा..
जबाबदारी असणाऱ्या मनाला
नसतो अधिकार रुसण्याचा
त्यांच्या वाट्याला असतो
अभिनय हसरे दिसण्याचा..
जबाबदारी हीच असते
सगळ्या बंधनाना बांधणारी..
माणसाला माणूस बनवून
नात्यातले दुवे संधणारी...
