करार
करार
1 min
153
दुःखाशी माझा करार झाला आहे,
आनंदी राहण्याचा मी शब्द दिला आहे.
सोडणार ना साथ तुझी,
त्यानेही वायदा केला आहे.
झाले सारे जग दुश्मन
तरी राखेल इमान दुःख...
मी ही म्हणाले विसरणार नाही
आले जरी जीवनात सुख..
जीवनाला तुझ्या अर्थ देईन
दुःख म्हणाले मोठ्या टेचात...
मीही मनापासून आभार मानील
पायी लागलेल्या प्रत्येक ठेचात...
क्षणभरही दूर नाही जाणार
निभावेन तुझी साथ हरघडी..
मी ही म्हणाले धन्य तुझी
बात तुझ्यात आहे बडी...
दुःख आणि मी झालो
हृदयापासून खरा मित्र..
बेवफा झाली दुनिया तरी
आमच्या दोघात जमते सूत्र...
