STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

3  

Shobha Sanjay Bavdhankar

Romance

पावसाची नशा

पावसाची नशा

1 min
38

रिमझिम पावसाने धरला जोर

कोसळू लागली पावसाची धार

शालू घालून उभी नार 


हिरवागार शालू, त्याला डोंगराचे काळे काठ

रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी सजली दरीची वाट


निसर्गालाही चढते पावसाची नशा 

मोरही थुइथुइ नाचू लागतो जसा 


पावसात मस्त भिजावे, व्हावे ओलेचिंब 

ओठांनी टिपावे तिच्या नाजूक गालावरचे थेंब


प्रणयाचा हा खेळ नकळत पावसात भिजतो लइ भारी 

उबदार प्रसन्न होते धरती सारी 


प्रसन्न मनाने बघावे इंद्रधनुष्याचे रंग सात 

प्रत्येकाला पावसात धरावासा वाटतो हातात हात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance