आनंद
आनंद




आपण एकमेकांजवळ आलो
आणि लखलखणारे तारे अजूनच चमकू लागले
तो चंद्र लाजला...
आश्चर्य म्हणजे
दरवर्षी उशीर करणारा तो पाऊस
लवकर येऊन आपल्याला चिंब भिजवून गेला
माझ्या सख्या गडबडल्या, तुझे मित्रही बिथरले
ते शोधत असलेल्या आनंदाने,
आपल्याला जे स्वीकारले..