हरपले मन माझे
हरपले मन माझे
काय करावे तुझे मी वर्णन
शब्दही पडतील अपुरे माझे
प्रेमात तुझ्या गुंतून जावे
भान या जगाचे मजला न राहावे
रूप तुझे ते पाहून भान हरपले त्याचे
वेळ काढून ज्याने तुला असे घडवले
चंद्रही चांदण्या कडे पाहुनी त्यांना पुसे
म्हणे माझे प्रतिबिंब पृथ्वीवर कसे दिसे
पाहुनिया तुजला अरे मृगनयनी
हरपले मन माझे रे तुझ्याच पाशी
म्हणूनच तुलाच उपमा दिली मेनकेची
पाहुनी तुझी ती चंचल कमनीय काया
मन अतीव्यापक होई तुझंशी पहावया
तू नसता जवळी मजपाशी
मजला भास मृगजळाप्रमाणे तुझाच होई
वाट तुझी मी चातक पक्षाप्रमाणेच पाहि
वाट तुझी ती पाहता नयन हे सुखावले
एक वेळेस भेटूनी मजला आपलेसे करावे