माझा शेतकरी बाप
माझा शेतकरी बाप


सकाळ सकाळ बाप माझा उठे घाई घाई
धावत-पळत काळ्या (जमीन) आईकडे जाई
म्हणे आम्हा सर्जा - राजा वाट माझी पाही
सकाळ माझा बाप म्हणून उठे घाई घाई............
राब राब राबतो तोच दिस दिन रात
पडून सगळं पाऊस पिकेलं माझं शेत
पण एवढंही स्वप्न नाही हो त्याचा नशिबात
स्वतःच्या मनी म्हणे कोणतं केलं पाप
एवढही सुख नाही का रे त्याच्या पदरात
सकाळ माझा बाप म्हणून उठे घाई घाई ...........
.जड पावली पावली तो घराकडे जाई
जाता त्याला दिस लेकरांची माई
बघून तिला त्याच्या डोळा आलं हो पाणी
पाहूनी म्हणे माझा बाळ झोपला का ग गुणी
जवळी जाऊन त्याचा कुरवाळी हातानी
म्हणे बाळा तू तर मोठा शिकून साहेब होय
मणी विचार करून वेगळा तो झाडाकडं जाई
माझ्या आयुष्यात आता उरलं नाही काही
जीवन संपवण्याची त्यानं केली बघा घाई,,,,,,,,,,,,,
खरच मित्रांनो आपल्या देशातील शेतकऱ्यांची हीच खरी परिस्थिती आहे त्यामुळे होईल तेवढे त्यांना सहकार्य करण्याची भावना ठेवा