STORYMIRROR

ganesh mane

Others

3  

ganesh mane

Others

प्रेम जीवनाचा प्रवास

प्रेम जीवनाचा प्रवास

1 min
159

सुरू झाला जीवनाचा आशादायी प्रवास

आता प्रत्येक क्षण आहे सुखदायी खास

समुद्राचा भरती आहोटी चा संपलाय वेळ

कधी नाही होणार असा नियतीने केला खेळ

आज ह्या ऋतूत चा भरून आलाय वसंत

नवीन तेजोमय पालवी जसे असे सुमिनात

तिमिरातून उमगलंय ते प्रेमाचा गोड प्रकाश

चहूबाजूने उजळून निघालाय संपूर्ण आसमंत

ना राहिले कशाचे भान नाही उरले तहान

तू दिला होकार हेच राहिले मला फक्त भान

आज मनाचं माझ्या फुलपाखरू उडतय

काय घडतंय ते फक्त त्यालाच कळतं

मनाचा होकार फक्त मनाला कळतोय

जरी वरुन बावरले तरी डोळ्यांना हसते

आज मनाला कोणतीच नाही राहिली खंत

दुःखांचा आज झाला आहे प्रेम अंत


Rate this content
Log in