STORYMIRROR

ganesh mane

Others

3  

ganesh mane

Others

तुला सांगायचे आहे कशाला

तुला सांगायचे आहे कशाला

1 min
181

प्रेम आहे तुझं वरती सांगायचे कशाला

उजळून निघाले मन तुझात प्रत्येक क्षणाला

पावसाच्या सरीचा वर्षाव होतोय कशाला

फक्त तुझीच आठवण येते ना या मनाला

मातीतला ओला गंध जाणवतोय कशाला

तुझाच प्रेमाच्या छंद जडला आहे ना मला

ती मंद वाहती हवा जाणीव करून देते कशाला

तुजला प्रतीत वाहुनी घेऊन जायचं आहे ना मला

त्या रात टपोऱ्या चांदण्यांची आठवण होते कशाला

त्या दिसणाऱ्या चंद्रकोर मध्ये दिसतेस तू फक्त मला

या सळसळत्या पानाचा आवाज होतोय कशाला

तुझा मंजुळ स्वरात गुंतून जायचं ग् मला

हा झुळझुळ ओढा आठवण करून देतो कशाला

तुझ्या अलगद मिठीमध्ये झोपायचे आहे ग मला

ह्या ऋतूत रात किड्यांची किरकिर होते कशाला

फक्त तूच पाहिजे आयुष्यभर माझ्या सोबतीला


Rate this content
Log in