STORYMIRROR

ganesh mane

Romance Thriller Others

3  

ganesh mane

Romance Thriller Others

विरह तुझा

विरह तुझा

1 min
186

काय हरवले कळलं नाही ग आजवर मला

सोडून गेला पक्षी परत आलाच नाही भेटायला

आठवण काढून तुझी डोळ्यातली पाणीही गेले सुकून

त्या कोकीलेचे मंजुळ गाणे बेसूर करतय ग मला

त्या आवाजात तुझा प्रेमस्पर्श नाही भेटतं ना मला

केतकीच्या बनात ऊन नाही भेटत या जमिनीला

असाच विरह झालाय मला तू नाही तर संगतीला

पावसाच्या ओल्या सरीची गरज असते जमिनीला

अशीच तु असावी वाटते मला माझ्या संगतीला

शरीरातून ज्या प्रकारे आत्मा जसं निघून गेला

तया आत्मा वाचून किंमत नाही निर्जीव देहाला

तशीच तुझी वाट बघतोय ग मी या समयाला

राशींची उधळण करून तो हेमजलं नेला

सागरी शिंपल्यातील मोती चोरीस गेला

तसेच तू गेल्याचे दुःख होतंय माझं मला.........

तुझ्या आवणीतच शोधतोय मी मला

घेऊनी भरारा जाऊ त्या पैल तिराला

त्या ठिकाणी नसेल कोणाचाही दरारा

तुझ्या त्या मिठीत राहू दे विसाव्याला........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance