मैत्री
मैत्री

1 min

32
जन्म नाही घेतला एका उदरी
पण आलास तू सोबतीस बरोबरी
या जगती सखे सोयरे होते तरी
नाही दिली साथ कोणत्याच परी
नाते अपुले असे अनेक जन्माचे
ज्या प्रमाणे नभी सूर्य आणी चंद्राचे
नाही तुज्या मना कोणतही स्वार्थची आसं
येतो संकट समयी पर प्रत्येक क्षण
नात्याची ही वेल नाही कळली या जगती
कळी उमलली आपल्या विश्वासाच्या प्रितीची
मनी सुगंध तयाच्या केशरी चाफ्याचा
सुगंध दरवळत राहो परी चंदनाचा