Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shreyas Gawde

Romance Inspirational

3  

Shreyas Gawde

Romance Inspirational

रंगबावरी

रंगबावरी

1 min
45


जी गुलाल उधळण केलीस तू ,

तो माझ्या शृंगाराचा एक-भाग झाला . . .

उघड्या डोळ्यांच्या काटेरी पट्यात मला तुझा 'आभास' झाला. . .


'आभासा' पेक्षा खरा 'भास' च बरा, तोच तुझ्या आयुष्याचा मंत्र खरा. .

रात्रीच्या अंधारातला तू दिवा तेवतो सदा. .

तेव्हा माझ्या चंदेरी दुनियेत तू सोन्याचा स्पर्श लखाकलेला शोभतोस बरा . . .


एकटेपणाची मोठी पोकळी निर्माण झालेली. .

तुझ्या आधी असण्याची अर्थ कारणे वजा झालेली. .

स्पर्श न दिलेल्या प्रेमाची आता खऱ्या अर्थाने सबब मिळाली. . .


कित्येक वेळा रंगीत स्वप्नाचा पाऊस पडला..

मन मारण्याचा हाच ठाम मुद्दा ठरला. . .

थापा मारण्याच्या याच प्रकाराला मी प्रेमाचा गुन्हेगार मानला. . .


मग पलटले हळू-हळू मन . . .

झाले माझे मतपरिवर्तन , तुझ्याविना असह्य झाले जीवन. . .

हेच होते गमक , आपल्या मैत्रितील अतूट नात्याचे सौन्दर्य विश्लेषण !


उघड्या डोळ्यात भरले होते मी काजळ ,

तू भरलास त्यामध्ये खरा 'रंग' . .

म्हणून मज वेडीच्या प्रेमात जुळून आले 'सप्तरंग'. . .


आता कुठल्याही मोजमापाची गरज नाही. .

कारण तू नेहमी प्रेम जपले स्वार्थ नाही. .

आता वाटते एक सुरीच्या माझ्या प्रेमाला नुसत्या देहाची गरज नाही. . .


लोकं म्हणतात आंधळं असतं प्रेम,

मी विचारते डोळस असून फायदा काय ?

मज आंधळीला तुम्हा लोकांच्या सहानुभूतीची गरज काय ?


पण तुझ्यापुढे मी सुद्धा सपशेल हरली . .

माणुसकीची कदर आता मला सुद्धा उमगली . .

आणि तुझिया सोबत ही 'रंगबावरी' कायमची उजळली. . .


Rate this content
Log in