मला तिच्याबद्दल लिहायला खूप खूप आवडतं
मला तिच्याबद्दल लिहायला खूप खूप आवडतं
मला तिच्याबद्दल लिहायला खूप खूप आवडतं
रूपाने देखणी जशी
नाजुकशी फुलांची पाकळी
थोडी साधी -सरळ नाते
जपणारी एक गोडशी मैत्रीण .....
थोडी रागट खोडकर स्वभावाची
क्षणात रागावणारी ,काही क्षणातच हसणारी
थोडीशी लाजरी मनमोकळी राहणारी
माझी एक गोडशी मैत्रीण ...
मला तिच्याबद्दल लिहायला खूप खूप आवडतं
तिला मी माझ्या कवितांमध्ये लिहितो
तिला शब्द कोड्यांमध्ये रंगवतो
फुलांमध्ये तिला सजवतो
सभोवतील दृश्यांमध्ये तिला एकरूप
करून माझ्या शब्दानं मधनं
तिची नवी ओळख करून द्यायला मला आवडतं
मला तिच्या बद्दल लिहायला खूप खूप आवडतं