इतकी का सुंदर दिसतेस तू ..
इतकी का सुंदर दिसतेस तू ..
इतकी का सुंदर दिसतेस तू ..
मी विचारल्यावर हळूच गालात का हसतेस
तू उघड कधीतरी हे रहस्य हि कसली जादू केलीस तू ...
तुझ्यातच माझं मन रमतं
तुझ्या सहवासातच ते हसत तुझ्या पासन दूर जायला मन घाबरत का
समजून घेत नाहीस तू इतकी का सुंदर दिसतेस तू ....
मनाच्या एका कोपऱ्यात सजवलंय ग तुला
माझ्या लेखणी ने कोऱ्या कागदावरती रंगवतोय तुला
नवीन काही लिहाय घेतलं तर तुझा हसरा चेहरा समोर येऊन जातो
इतकी का सुंदर दिसतेस तू ……….
शब्दांच्या कोड्यांमधून&nbs
p;निघून तुझ्या स्वप्नांमध्ये रमून जातो
इतकी का सुंदर दिसतेस तू
ना कळत तुझ्यातच गुंतून जातो मी इतकी का सुंदर दिसतेस तू ……….
पावसाच्या सरीत भिजताना खूप छान दिसतेस
तू बागेमधील फुलांकडे बगता नजरेस पडते तू
तुझं रूप बघून गुलाबाच्या फुलाला लाजायला येईल
इतकी का सुंदर दिसतेस तू ....
डोळे बंद करताच येतेस समोर तू
डोळे बंद करताच समोरून जातेस तू
येवडंच तुझं माझं नातं नसतानाही माझ्यासोबत असतेस तू ......