STORYMIRROR

Suraj Rathi

Romance

4  

Suraj Rathi

Romance

तूच का मला आवडतेस ?

तूच का मला आवडतेस ?

2 mins
2.8K

तूच का मला आवडतेस?

मला नाही माहिती,

पण खूप आवडतेस,

इतकंच मला माहिती...


ना तू कुठली राजकुमारी, ना तू खूप सुंदर,

तरीही तू खूप छळतेस मला,

किती लाजल्यासारखं होतं माहितीय?

हळूच हसऱ्या नजरेने जेव्हा बघतेस तू मला...


असताना सोबत तुझ्या काय सांगू... वाटतं कसं?

चिखलात कमळाचं अलगद फुल उमलावं तसं,

कोमल स्पर्शाने तुझ्या काय सांगू... वाटतं कसं?

मयुरपंखाने अंगावरून सरकावं तसं...


तू काहीही केले तरी मला ते सुंदरच वाटते,

प्रेमाने तुला बघण्याची माझी नजरच तशी...

तू नेहमी विचारतेस ना मी इतका साधा सरळ कसा?

इतका साधा सरळ नाही गं मी, जेवढी तू मला समजतेस 

माझा स्वभाव अन् तुझी बघण्याची नजरच तशी...


आवडतं मला तुझं..... माझ्या स्वप्नात येणं,

माझा हात चालता चालता तुझ्या हातात घेणं

हे सगळं असंच मला आयुष्यभर देशील का?

स्वर्ग नकोय मला... असंच नेहमी तुझी साथ मला देशील का?


अक्षरश: वेडा आहे मी तुझ्यासाठी,

फक्त एक कर माझ्यासाठी...

बाकी काही नाही दिलेस तरी चालेल,

फक्त खूप आठवणी दे मला...

तुझी सोबत नसतानाही हसण्यासाठी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance