STORYMIRROR

Suraj Rathi

Romance

3  

Suraj Rathi

Romance

सांग ना सांग ना तू मला

सांग ना सांग ना तू मला

1 min
199

सांग ना सांग ना तू मला, तू माझीच आहे सांग ना

माझी नजर जेव्हा तुझ्या नजरेशी भिडते,

हृदयाची धडधड, अचानकच वाढते,

तू जवळ नसलीस की तुला भेटावंसं वाटतं...

तू जवळ आलीस की उगीचच उठून जावंसं वाटतं...

सांग ना सांग ना तू मला, तू माझीच आहे सांग ना


तुझ्याशी जेव्हा मी बोलतो, तेव्हा मला बोलल्यासारखं वाटतं

तुझा नाजूक आवाज ऐकून, अंग शहारल्यासारखं होतं...

तुझं बोलणं, तुझं वागणं, मला विचार करायला लावतं

तुझ्या डोळ्यात माझं अस्तित्व, नेहमीच मला दिसतं

सांग ना सांग ना तू मला, तू माझीच आहे सांग ना


तुझ्या आठवणीत बेधुंद होऊन जातो मी,

तुझ्या स्वप्नात मंद होऊन जातो मी,

ज्या प्रमाणे एखादी वाऱ्याची झुळूक हळुवारपणे अंगाला स्पर्श करून जाते

अगदी त्याचप्रमाणे तुझी ओढ मनाला लागलेली असते

सांग ना सांग ना तू मला, तू माझीच आहे सांग ना


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance