ऐकना तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला
ऐकना तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला
तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला
ऐकना वारा सांगतोय मला
तुझ्या पाऊलांच्या पैंजणांचा
आवाज कानाला ऐकू येऊ लागला
जीव माझा वेडा होऊ लागला
ऐकना तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला
बघं सांजवेळी रंग हे सुखाचे
नवी साद घालती तुझी
मला स्पर्श जानवी तुझा
स्वप्नपण तुझ्याकडेच ओढ लावी
ऐकना तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला
तू सोबत हवी हवीशी
वाटते पुन्हा पुन्हा
माझे मन सांगे मला
ऐकना तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला
बघं रात्र अशी की लख्ख चांदणे
प्रकाश पसरवी सर्वत्र भूमीवरी
शोधते माझे मन तुझ्या
रुपाला सुंदर चंद्रामधी
आठवण तुझी करुनी देई
हास्य माझ्या चेह-यावरी घेऊन येई
ऐकना तुझ्या चाहुलीचा भास होतोय मला

