कळले पण वळले नाही
कळले पण वळले नाही
कडा होत्या पाणावल्या ,
अश्रू दावता आले नाही.
सांगायचे होते खूप सारे ,
मात्र ओठ उलवता आले नाही.
प्रयत्न केला सांगायचा,
तुला ओळखता हि आले नाही.
हरकत नाही तक्रार नाही !
हरकत नाही तक्रार नाही !
अबोल होते प्रीत माझी ,
तुझा काही गुन्हा नाही .
भरली होती ओंजळ माझी ,
तू मागे वळला ही नाही.
देण्या होती निघाले मी,
मलाच ती सांभाळली नाही.
विखुरली सर्वत्र प्रीत माझी,
वेचण्यास ही तू आला नाही.
अजुनही प्रतिक्षेत मी,
ती फुले मी देवालाही वाहिली नाही.

