ओले स्पंदन
ओले स्पंदन
एकलीच मी वाट शोधताना
गवसेल का मनी किनारा
क्षितिज कवेत असताना
उत्कंठ हुंदक्याचा पहारा.
श्वासांन्ती उमेद आशेची
साथ अमीट बंधनाचा
कापरा विश्वास जरी हा
ध्वनीहलक्या स्पंदनाचा
काहूर माजला अंतरी
ठोका चुके काळजाचा
एक सुरही धड ऐकवेना
धडधडत्या हृदयाचा
