पिता
पिता
शब्द कठोर ज्याचे ,
भावनेत गोडवा होता .
चेहऱ्यावर रागांचे फवारे ,
मनात अनुराग होता .
दिले मुक्त विचारांचे दालन,
अनुशासनात ठेवत होता.
सदा बोले उंच स्वराने,
मायेचा झरा पाझरत होता.
भरलेला खिसा दाखवी सदा,
कैकदा तो रिकामा होता .
विसरुनी सारी स्वतःची स्वप्ने,
लेकरांची स्वप्ने गुंफीत होता.
संतान सुखात आनंद मानला ज्याने ,
कितीदा तरी डगमगला होता.
हास्य सदा फुलविले ज्याने ,
सर्वांचा लाडका होता.
ईश्वराआधी स्थान ज्याचे
तो केवळ पिताच होता.....
