प्रार्थना
प्रार्थना
अमृत मुहूर्ती उठुनी करावी प्रार्थना
उषःकाल होता-होता करावी साधना।
साधनेची प्राप्ती होता करावी आराधना
श्रद्धेशिवाय पूजेला प्रतिभा नाही !
प्रतिभा प्राप्तीसाठी विद्या सपनात यावी
विद्या प्राप्तीनंतर लक्ष्मी नांदावी घरी।
गायत्री मंत्राची उपासना करून।
आराध्यांची पूजा, क्षमेची अर्चना करावी !
कवितेची कल्पना करून गजल करावी।
संध्येला वंदन करून, निशाचे स्वागत करावे
कवीच्या कल्पनेत जावून साधना साधावी !
जीवनाच्या अंतसमयी शांती मिळावी
हीच भक्तीरूपी गीतेची आरती !
प्रसादरूपी माधुरी प्रासादी यावी।
हीच प्रार्थना सरस्वती चरणी
करावी आकांशा ही माझी पुरी