Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sayali Kulkarni

Romance Classics Fantasy

4.1  

Sayali Kulkarni

Romance Classics Fantasy

माझी कविता आज माझ्यावर रुसली...

माझी कविता आज माझ्यावर रुसली...

1 min
525

किती विनवले तिजला किती समजूत घातली... 

अचानक काय झाले कळे ना ती का रागवली... 

पडलो तिच्या पाया तरीही न बधली... 

माझी कविता आज माझ्यावर रुसली... ||

माझ्या मना लागला एक तिचाच ध्यास... 

तिच्याविना जग सारे मज वाटते उदास... 

माझ्या मनीची व्यथा परि तिला न उमगली... 

माझी कविता आज माझ्यावर रुसली... ||

हे मन करते एक तिचाच विचार... 

तिच्याविना मजला रुचेना आहार... 

असाच दिवस सरला परि न स्फुरली... 

माझी कविता आज माझ्यावर रुसली... ||

खूप केला विचार तरी विषय सापडेना... 

केले बहु यत्न परि ती मौन काही सोडेना... 

अखेरीस मी तिच्यावरच कविता रचिली.. 

कारण माझी कविता आज माझ्यावर रुसली... ||

Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance