STORYMIRROR

Sayali Kulkarni

Inspirational

4  

Sayali Kulkarni

Inspirational

आपलं माणूस

आपलं माणूस

1 min
487

भरले डोळे पुसण्यासाठी आपलं माणूस लागतं... 

आनंदाचा उत्सव करण्यासाठी आपलं माणूस लागतं... 

कौतुकाने पाठ थोपटायला आपलं माणूस लागतं... 

पाठीवर रट्टा द्यायलाही आपलं माणूसच लागतं... ||


अशी आपली माणसं काही सहजासहजी मिळत नाही...

जमिनीची मशागत केल्याशिवाय पिवळं सोनं दिसत नाही... 

खत, पाणी मुबलक मिळालं की पीक कसं तरारून येतं.. 

काळजात प्रेम, आदर, माया असली की आपलं माणूस भेटतं...||


आॅनलाईनच्या जमान्यात सगळं काही घरपोच मिळतं... 

भाजीपाला, किराणा, जेवण काही क्लिकवर घरी येतं... 

एक गोष्ट मात्र मित्रांनो कधीही ऑनलाईन मिळत नाही... 

मन मोकळे करायला आपलं माणूस घरपोच कधीही येत नाही.. ||


म्हणुनच सांगतो मित्रा पैशांबरोबर आपली माणसं पण जोडायला शिक... 

इगो, राग नि मत्सर सोडून नात्यांचे अतूट बंध विणायला शिक... 

नातं टिकवायला कधी तरी कमीपणा हा घ्यावाच लागतो...

नात्यांच्या श्रीमंतीनेच माणूस खरा श्रीमंत होतो.. ||


आपली माणसं जोडणं खरंच इतकं काही अवघड नाही... 

थोडासा दुसऱ्याचा विचार केला तर नातं कधीही तुटत नाही... 

सहजच केलेला फोन खरंच खूप आनंद देऊन जातो... 

धावती जरी भेट दिली तरी आपला माणूस सुखावतो... ||


एकटं एकटं जगण्यात खरं सांग बरं काय मजा आहे?? 

आपलं माणूस सोबत नसेल तर जीवन जगणं सजा आहे... 

आपलं माणूस सोबत असलं की नैराश्य दूर पळतं... 

आपल्या माणसांमुळेच गड्या आयुष्य सुंदर बनतं...|| 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational