Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sayali Kulkarni

Classics Inspirational

4.1  

Sayali Kulkarni

Classics Inspirational

सुख म्हणजे...

सुख म्हणजे...

1 min
435


सुखाचा शोध घेत कुठे कुठे वणवण फिरतोस?? 

सगळं काही मिळूनही शेवटी अतृप्तच राहतोस... 


आपला जसा दृष्टिकोन तसंच तर जग दिसतं... 

छोट्या छोट्या गोष्टीत पण मोठं सुख दडलेलं असतं.. 


सुख म्हणजे पाऊस, चहा आणि खमंग भजीची प्लेट... 

सुख म्हणजे मित्राने आवर्जून घेतलेली गाठभेट... 


सुख म्हणजे जमून आलेली एखादी भन्नाट रेसिपी... 

सुख म्हणजे आपल्या माणसाने दिलेली जादूची झप्पी... 


सुख म्हणजे मंदिराच्या आवारातील प्रसन्न शांतता... 

सुख म्हणजे अकस्मात सुचलेली एक सुंदर कविता.. 


सुख म्हणजे वेलीला उमललेलं छान नाजूक फुल... 

सुख म्हणजे निरागस आणि गोड हसणारं मुल... 


सुख म्हणजे दुपारी घेतलेली क्षणभराची विश्रांती... 

सुख म्हणजे बालचमूंची खेळ, दंगा आणि मस्ती... 


सुख म्हणजे आभाळभर पसरलेलं पांढरंशुभ्र चांदणं... 

सुख म्हणजे प्रियेचं आकर्षक मनमोहक लाजणं... 


सुख म्हणजे मैत्रिणींसोबत मनमुराद भटकणं.. 

सुख म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला हरवणं..


सुख म्हणजे गप्पागाणी नि रंगलेले पत्त्यांचे डाव... 

सुख म्हणजे मऊ लुसलुशीत पुरणपोळीवर मारलेला ताव... 


सुख म्हणजे वडीलधाऱ्यांचे कौतुकाचे बोल... 

सुख म्हणजे मेहनतीला मिळालेले अमूल्य मोल... 


सुख म्हणजे स्वप्नपूर्तीनंतर होणारा आनंद...

सुख म्हणजे वेळात वेळ काढून जपलेला छंद...


सुख म्हणजे चौपाटीवरची चटकदार ओली भेळ...

सुख म्हणजे मुलांसोबत हसतखेळत घालवलेला वेळ...


तक्रार करणं सोडून दिलं की समाधान नक्की मिळतं...

सुखाच्या छोट्या छोट्या क्षणांनी आयुष्य सुंदर बनतं...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics