माझी आई
माझी आई
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
आठवण येता आई तुझी हा जीव कातर होई...
कुशीत घेण्या मजला सत्वर धावून ये ना आई... ||
तुला पाहण्या आसुसले हे माझे दोन्ही नेत्र...
तव स्पर्शाची मिळता ऊब तृप्त होतील गात्र.. ||
अल्पमती मी मज समजेना कशी वर्णू तव महती...
आई त्याग नि वात्सल्याची असते ओतीव मूर्ती... ||
घरासाठी या अविरत झटते ना मनी कोणता स्वार्थ...
आईवाचूनी या जगण्याला उरतच नाही अर्थ...||
कितीही मोठे झालो तरीही तिची माया कमी न होई...
प्रेमाचा अर्थ सांगण्या देव आई रुपाने येई... ||
सर्वस्व देऊनी आम्हा घडविले कशी करू उतराई...
कुशीत घेण्या मजला सत्वर धावून ये ना आई...