STORYMIRROR

Sayali Kulkarni

Others

3  

Sayali Kulkarni

Others

सहजच कधीतरी...

सहजच कधीतरी...

1 min
272


सहजच कधीतरी...

मनी दाटतात काळे ढग... |

मन होतं खिन्न.. 

सारं उदास वाटतं जग... ||


वाटतं कोणाच्यातरी जवळ

मन मोकळं करावं... |

मनातलं सारं दु:ख आपण

त्याला कथन करावं... ||


आपलं सारं म्हणणं त्याने

शांतपणे ऐकावं... |

मी आहे सोबत म्हणून

आश्वस्त करावं... ||


पण आजकालच्या जगात... 

 असं काही घडत नाही... |

समजून घेणारं लांबच..

ऐकून घेणारंही भेटत नाही...||


जो तो आपल्या दिनक्रमात... 

इतका व्यस्त असतो... |

माझे घर, माझी स्वप्ने

यात

च तो पुरता गुरफटतो...||


दुसऱ्याकडे लक्ष द्यायला 

नसतो कोणाकडेही वेळ...|

मी नि माझे कुटुंब यातच 

संपतो आयुष्याचा खेळ... ||


जन्मभर धावून देखील.. 

मिळत नाही समाधान .. |

कारण माणसाचं सुख माणसांत असतं 

याचंच नसतं भान... ||


दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू 

खुप काही देऊन जातं... |

दुसऱ्याचं दु:ख हलकं केलं 

की समाधान मणभर वाढतं... ||


एकमेकांना वेळ देऊ

नि घेऊ एकमेकांना समजून...|

सुखदुःखे वाटून घेऊ.... 

आनंदाचं झाड येईल बहरून... ||


Rate this content
Log in