जीवन
जीवन


जीवन सुंदर आहे गड्या निखळ जगता आले पाहिजे..
आनंदाचे चार क्षण आपल्याला वेचता आले पाहिजे... ||
जीवन सापशिडीचा खेळ आहे आपण खेळत जायचे ...
शिडी आली वर जायचे सापाला पण तयार राहायचे..
सापावरुन खाली आलो तरी कधीही शिडी मिळू शकते..
जीवन चढ उतारांनी सजलेली रोलर काॅस्टर राईड असते.. ||
जीवन असावे नदीसारखे जी खळखळ वाहत असते...
मोठे खडक आले तरी कधीच वाहणे थांबवत नसते...
खडकांतून वाट काढत तिच्या सारखे पुढे जात राहायचे..
वाहत वाहत शेवटी आनंदाने सागरात विलीन व्हायचे...||
जीवन क्रिकेट आहे मित्रा एक एक बॉल खेळत जायचे असते. ..
पुढचा चेंडू कसा येईल हे कोणालाही माहित नसते...
कधी फोर कधी सिक्स तर कधी आऊट पण होतच असतो..
पण आऊट झाला म्हणून कधीही खेळ थांबत नसतो..
कुठला चेंडू सोडायचा आणि कुठला उंच उचलायचा हे फक्त पहायचे..
फुलटॉस चेंडू आला की बिनधास्त सि
क्सर ठोकून द्यायचे..||
जीवन म्हणजे ऊन नि पावसाचा लपाछपीचा खेळ असतो...
ग्रीष्माच्या काहिलीनंतर येतो म्हणूनच पाऊस जास्ती सुखावतो...
कितीही कडक उन पडले तरी पाऊस हा नक्की येतो...
थकल्या भागलेल्या जीवांना तो संजीवनी देऊन जातो...||
जीवन म्हणजे आदि पासून अंतापर्यंतचा एक प्रवास असतो..
हिल स्टेशनवर जाण्यासाठी नागमोडा घाट पार करावाच लागतो..
कधी एक्सप्रेसवे तर कधी पायवाट, आपण चालत रहायचे...
डेस्टिनेशन बरोबरच प्रवासातील मजा लुटण्यास शिकायचे... ||
जीवन म्हणजे सांगू सख्या आंबटगोड चटकदार भेळ असते...
नुसतीच गोड भेळ सांगा बरं कोणाला कुठे आवडते???
खमंग फोडणी होण्यासाठी कडवट हिंग असावाच लागतो..
चविष्ट पोह्यांमध्ये कधी कधी कडवट दाणा येत असतो..
कडवट दाणा काढून परत पोह्यांची मजा घेता आली पाहिजे...
जीवन सुंदर आहे गड्या निखळ जगता आले पाहिजे... ||