निरोप
निरोप
1 min
262
निरोप देताना कंठ आपसुकच दाटला.
लोचनी आसवांचा पूरच जनु साठला.
अचानक दिसता आनन नयनी वदला,
बांधलेला धीर आपसुकच जणू सुटला.
क्षणात खण्डले ह्रदय जणू दर्पण फुटला,
खेळ खेळुनी तू तर अन्यत्र सहज रमला.
मुकी भाषा गीत गुणगुणत स्वर हरवला,
हरलेल्या प्रीतीस नवा अर्थ गवसला.
