बंध प्रेमाचा
बंध प्रेमाचा
असला जरी ईश कान्हा
सोलल्यापिडा प्रेमाच्या
ह्र्दय झाकूनी अंतरी
बेडीत जबाबदारीच्या
हिरा ही कुठे मागे होती
संगती तीही रमणाच्या
सोडता गोकुळ सारकरती
घोट पीत हुंदक्याच्या
देव ही न चूकला
मी कसे सुटेल फेर दैवाचा
खरी असली प्रीत जरी
नशीबी नाही योग मिलनाचा
नाही आस ना अपेक्षा
तू सदा सुखी असावा
माझा नसला जरी तरी
सदैव आनंदी रहावा
अंतरी आहेत अमीट गाठा
ह्रदयी असेल दडून साठा
आठवांची गोड ती शिदोरी
पुढच्या जन्माची उधारी
उजवून कुस प्रीतीची
हाती ज्वाला विरहाची
तोडून बंध प्रेयसीची
हाती सुत्र कर्तव्याची
क्षमा याचते निर्बंधाला
तोडत्या संगवचनाला
तुच एक समजशील
सुटत्या हात हातातला.
