तरसती अवनी
तरसती अवनी
बेधुंद दिशा तारकांची पर्वणी
तुझ्या प्रीतीच्या खेळात जणू
ह्र्दय माझे झाले खेळणी,
खेळ खेळून झाला आता
कंटाळाच आला जणू
रीतसर करुन नवी मांडणी
हा खेळ तर रोजचा च तुझा
नवलच काय त्याचे जणू
एक डाव मोडून नवी आखणी
तुझाच तोरा पैशात मोजतो
नाते संबध व्यापार जणू
तोलून मापतो प्रीत देखणी
चंद्र तू अचुंब गगनातला
माझा नसून परका जणू
भासते मी तरसती अवनी

