STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आली आली पन्नाशी

आली आली पन्नाशी

1 min
314

चाळिशीला ओलांडता

आली आली हो पन्नाशी

नको मनी संदिग्धता

करु साजरी पन्नाशी


साहित्याचे वरदान

दैवदत्त लाभलेले

कष्ट जिद्द प्रयत्नांनी

पुरस्कार मिळवले


गोड वाणी वरदान

अंगी नम्रता ऋजुता

घेई सहज जिंकूनी

मनी ना आपपरता


नित्य कार्यक्रमांमधे

झरे गोड निवेदन

ज्ञान नि मनोरंजन

द्यावे वय झुगारुन


कृपावंत सरस्वती

देवो आशिर्वचनासी

दीर्घ आयुः आरोग्याचे 

वरदान लाभण्यासी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract