स्वर्थ निस्वर्थाचा....
स्वर्थ निस्वर्थाचा....


चुलीवरच्या भाकरी ला
चव तुझ्या हातांची
कोळश्याच्या परी धुपत होती
चुल तिच्या संसाराची
कोळश्या परी धुपत होती
आयुष्यात नेहमी जाळा साठी
देवा परी समजलं तिने
धन्याला त्या संसारा साठी
कष्टाची जान तिच्या
कर्तव्य म्हणून टाळावी
पुरूषार्थ जपण्यासाठी
तिने लाज त्याची जपावी
दुखवावे घाव तिचे
टोचलेल्या त्या काट्यापरी
कशी येणार सांग लेका
भोळी लक्ष्मी तुझ्या दारी