STORYMIRROR

Padmakar Bhave

Abstract

3  

Padmakar Bhave

Abstract

लिहून झाले

लिहून झाले

1 min
245

सारे लिहून झाले,पाटी तरीच कोरी

आता न ओळखू येई, प्रतिमाच ही बिलोरी


रेखुन चित्र झाले,रेषा तरी जमेना

चुकलेहे काय कोठे,काहीच आकळेना


मेंदू विझून जातो,गोंधळ तरी सुटेना

खोदून फार झाले तो पाझर कसा फुटेना


हे यत्न तोकडे का,माझे मला कळेना,

ही आर्त हाक देता, प्रतिसाद का मिळेना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract