पाऊस...तू..मी
पाऊस...तू..मी
*तू ..पाऊस..वीज*
तू पाऊस होऊन येते
कोसळते... चिंब करते
जाताना गाणे ओले
ओठांवर ठेवून जाते...
तू मजला बिलगून बसता
एक वीज कडाडत येते
फुटतो मग ढग दोघांचा
ओघात वाहवत जाते
सावरू पहातो दोघे
आतील हवेसे वादळ
पाऊस वाढता होतो
अधरांनी चुंबीत ओघळ
तू शुभ्र धुक्याची साडी
लेवून उभी असतांना
पाऊस बावळा होतो
देहातून पाझरतांना
पाऊस पिऊनी दोघे
आकंठ तृप्त होतांना
तू कविता होऊन येते
ये मोहर मग शब्दांना
*
--पद्माकर भावे*

